शहाजीराजे (वडिल)
प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.
जिजाबाई (आई)
जिजाबाई व बाल शिवाजी
जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी दादोजी कोंडदेवांच्या मदतीने पुण्याची पुन:स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ति दिली असे काही इतिहासकार मानतात.
पत्नी
सईबाई निंबाळकर
सोयराबाई मोहिते
पुतळाबाई पालकर
लक्ष्मीबाई विचारे
काशीबाई जाधव
सगणाबाई शिंदे
गुणवंतीबाई इंगळे
सकवारबाई गायकवाड
वंशज
मुलगे
छत्रपती संभाजी भोसले
छत्रपती राजारामराजे भोसले
मुली
अंबिकाबाई महाडीक
कमळाबाई (सकवारबाईची कन्या)
दीपाबाई
राजकुंवरबाई शिर्के (सगुणाबाईची मुलगी, गणोजी शिर्के यांची पत्नी)
राणूबाई पाटकर
सखुबाई निंबाळकर (सईबाईची मुलगी)
सुना
संभाजीच्या पत्नी येसूबाई
राजारामांच्या पत्नी ताराबाई (माहेरच्या मोहिते)
जानकीबाई
राजसबाई (पुत्र संभाजी - १६९८-१७६०)
अंबिकाबाई (सती गेली)
सगुणाबाई
नातवंडे
संभाजीचा मुलगा - शाहू
ताराबाईची राजारामाची मुले - दुसरा शिवाजी
राजसबाईची मुले - दुसरा संभाजी
पतवंडे
ताराबाईचा नातू रामराजा, याला शाहूने दत्तक घेतले, म्हणजे तो स्वतःचाच काका झाला.
दुसऱ्या संभाजीचा मुलगा - द्वितीय शिवाजी (खरेतर ३रा शिवाजी) (कोल्हापूर)
No comments:
Post a Comment
thank you for comment